‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !

‘२८.११ ते ६.१२.२०२३ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही (मी, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. श्रीराम लुकतुके) इंडोनेशिया येथील जकार्ता आणि बाली येथे गेलो होतो. तेथे स्वामी श्री. आनंद कृष्णा यांनी आमची निवासव्यवस्था आणि प्रमुख स्थळांना...